ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांनी तब्येत खालावली ; मुख्यमंत्री शिंदे करणार आज घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या ७ दिवसापासून मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे मात्र त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारविरोधात रोष व्यक्त करीत आहेत. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत.

या पत्रकारपरिषदेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख २२ फेब्रुवारी ठरवली आहे.

मात्र, मनोज जरांगेंचं आंदोलन आणि मराठा समाजाचा रोष पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २२ फेब्रुवारीच्या आधीच विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. यासोबतच मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत नेमका काय अहवाल दिला, याबाबतची माहिती पत्रकारपरिषदेत देऊ शकतात. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशी आपलं उपोषण सुरू ठेवलं असलं, तरी कोर्टाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष बाब म्हणजे गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी १ वाजता जरांगे जाहीर पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!