ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल काशी जगद्गुरूंच्या हस्ते पत्रकार मारुती बावडे यांचा सन्मान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी व सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक मारुती बावडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व अक्कलकोट भूषण म्हणून नुकताच पुरस्कार मिळाल्याबद्दल काशी पिठाचे श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते औसा संस्थांनच्यावतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कर्नाटकातील अलगुड (ता.बसवकल्याण ) येथे विणा परंपरेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल औसा संस्थानचा भव्य नाथषष्ठी उत्सव सुरू आहे.

या कार्यक्रमात जगद्गुरु व श्री क्षेत्र हरकुड येथील ष. ब्र.डॉ.चन्नवीर शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.मारुती बावडे यांनी आत्तापर्यंत सामाजिक भान राखत पत्रकारितेची नीतिमूल्य जोपासून सामाजिक समतोल राखत पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवले आहेत.तेवीस वर्षाच्या पत्रकारितेत त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे त्याबद्दल आंतरराष्ट्रीयस्तरावरून व अक्कलकोट भूषण म्ह्णून गौरव होणे ही बाब औसा संस्थांनला देखील अभिमानास्पद आहे म्हणून आम्ही त्यांचा गौरव करत आहोत,अशा शब्दात पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी कौतुक केले.

यावेळी काशी पिठाचे जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बावडे यांना शुभाशीर्वाद देत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.आपण हाती घेतलेल्या कार्य यापुढेही निरंतरपणे चालू ठेवा.सामाजिक तसेच अध्यात्मिक कार्यात आपण पुढेही सक्रिय राहावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी औसा संस्थांनचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा औसेकर महाराज,ह.भ.प. श्रीरंग महाराज,ह.भ.प. ज्ञानराज महाराज आणि आईसाहेब श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंडरे,आमदार शरणू सलगर,कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धर्मसिंग यांचे चिरंजीव विजयसिंग,अलगुड संस्थांनचे श्रीकांत पाटील,गोविंदराव पाटील,अनिल सोमवंशी,ओमप्रकाश बिरादार,दिलीप सिद्धे,मोहन चव्हाण,जितेंद्र जाजू,किशोर पुदाले,जयहिंद व्हनंताळे,अरविंद वाडीकर,राजप्पा वाडीकर,तानाजी सोमवंशी,भास्करराव परांडे,बालाजी वाडीकर,विष्णू इसाजी आदिंसह अलगुड ग्रामस्थासह धाराशिव, लातूर,सोलापूर जिल्ह्यातील भक्तगण धर्मसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!