अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्यात मराठी शाळा प्रमाणे कन्नड शाळा सीमावर्ती भागात जोमाने काम करत आहेत.विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे शाळांच्या विकासासाठी कर्नाटक सरकारने विशेष निधी द्यावा,अशी मागणी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केली आहे.
कर्नाटक सरकार आयोजित गुडडापुर येथील कर्नाटक ५० या कार्यक्रमात उपस्थित कर्नाटक सरकारचे समाजकल्याण व कन्नड सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी ,कृषी मंत्री शिवानंद पाटील , जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देण्यात आले.अक्कलकोट तालुक्यातील कन्नड शाळेतील विविध समस्या , शैक्षणिक साहित्य,भौतिक सुविधा कर्नाटक सरकारकडून मिळावेत. अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती भाग आहे.त्यामुळे सातत्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
कर्नाटक सरकारने याकडे विशेष लक्ष दिल्यास आणखी सुधारणा अपेक्षित आहे,यासाठी निवेदन देण्यात आल्याचे शरणगौडा पाटील यांनी सांगितले. यावेळी सिद्धाराम पाटील, एकनाथ मोसलगी आदी उपस्थित होते.