अक्कलकोट, वृत्तसंस्था
स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी यांचा स्वभाव, अतिशय मनमिळावू आणि मितभाषी होता.त्यांना समाजकार्याचा ध्यास होता. या भागाच्या विकासाबद्दल तालुक्याबद्दल विशेष तळमळ होती आणि असा चेहरा आपल्यातून अचानकपणे निघून जाणे ही बाब खरोखरच पोकळी निर्माण करणारी आहे. त्यांचे हे अधुरे स्वप्न भरमशेट्टी परिवार निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
सोमवारी,अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील महादेव मंदिरात स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेऊरचे काका पाटील हे होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, भरमशेट्टी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये रुग्णसेवेला खूप प्राधान्य दिले. चप्पळगाव भागासाठी विशेषता त्यांचे एक खूप मोठे स्वप्न होते. आता ते स्वप्न पुढे घेऊन जाण्याची आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचे बंधू विश्वनाथ व राजकुमार भरमशेट्टी यांच्यावर आहे आणि ते निश्चितपणाने पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.त्यांना आपल्या सर्वांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,काका पाटील, दिलीप बिराजदार, तुकाराम दुपारगुडे, बसवराज बाणेगाव यांनी मनोगत व्यक्त करताना भरमशेट्टी यांच्या सहवासातील अनेक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मनोगत व्यक्त करताना क्रांती दर्गो पाटील यांनीही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरमशेट्टी परिवार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी
माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, अतिष बिराजदार, अशपाक अगसापुरे, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी ,राजकुमार भरमशेट्टी डॉ.नेहा येळापुरे-भरमशेट्टी, राजू पाटील, वकिल बागवान, इरसंगप्पा गड्डे, शाकिर पटेल, व्यंकट मोरे , व्यंकट पाटील, संजय बाणेगाव, मोहन चव्हाण, मंजू चौधरी, सिद्धाराम भंडारकवठे, सोपान निकते, गोटू मंगरुळे आदींची उपस्थिती होती.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. निलेश येळापुरे ( फुप्फूस रोग तज्ञ ) व डॉ. बसवराज सुतार (हृदयरोग तज्ञ) व त्यांची टीम सहभागी झाली होती. यामध्ये २७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ११८ जणांनी रक्तदान केले.याकामी आश्विनी ब्लड बँक व शिवशंभो ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात भरमशेट्टी यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशनही
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ पारतनाळे यांनी केले तर आभार मनोज भरमशेट्टी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी,उपाध्यक्ष रमेश छत्रे, नरेंद्र जंगले, चंद्रकांत रोट्टे, नरेंद्र जंगले, सिद्धाराम पुजारी, परशुराम बाळशंकर, शब्बीर जामदार, निरंजन हेगडे ,राजू सुतार, तिपण्णा हेगडे, मल्लिनाथ कोरे, सुभाष भरमशेट्टी, अप्पू हताळे आदींनी परिश्रम घेतले.