अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिन व नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त उद्या दि.१३ मार्च रोजी लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्यावतीने देण्यात आली. गेल्या वर्षापासून ही परंपरा कुरनूरनगरीमध्ये सुरू आहे.हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत आहे.सकाळी श्री दत्त मूर्ती अभिषेक होईल.दुपारी बारा वाजता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गुलालाचा कार्यक्रम होईल.त्यानंतर अक्कलकोट समाधी मठाचे वेदशास्त्री संपन्न श्री आणू महाराज पुजारी व गावातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम होईल.
त्यानंतर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.लक्ष्मण शक्ती सोहळा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल.भावार्थ युद्धकांड अध्याय ४३ ते ४९ वाचन व प्रवचन होईल.यात अक्कलकोट, सांगवी, काळेगाव,कोळेकरवाडी, मोट्याळ,बावकरवाडी, हसापूर,दहिटणे, निलंगा, आष्टा कासार, चुंगी आदी गावातील सर्व वाचक, प्रवचक भाविक या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.