---Advertisement---

स्व.ब्रह्मनंद मोरे प्रतिष्ठानकडून तारामाता शाळेला ५१ हजारांचे अर्थसहाय्य

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील स्व.ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित
श्री तारामाता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य घेण्यासाठी ५१ हजार रुपये देणगी दिली आहे.संस्थेचे अध्यक्ष राजीव माने मुख्याध्यापिका सुवर्णा कदम यांच्याकडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी धनादेश सुपूर्द केला. या निधीतून विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबर खेळाद्वारे सर्वांगीण विकास व्हावा हे भूमिका या पाठीमागची आहे त्या दृष्टीने प्रतिष्ठानने त्यांना मदत केली आहे, असे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, संस्थेचे संचालक संतोष फुटाणे,सुधाकर गोंडाळ,अमोल पाटील, सूर्याजी पाटील,शुक्राचार्य चव्हाण आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!