ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार

मुंबई, वृत्तसंस्था 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी  महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात.  जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असून त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते.

राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.  याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुले किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाणणी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे. त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!