ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी.. लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये ?

मुंबई, वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते. आता निवडणूक झाल्यांनतर लाडक्या बहिणींना कधी आणि किती पैसे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरीदेखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. आता दरमहा २१०० रुपये नंतर द्या, पण तूर्तास १५०० रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे.

सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी दोन हप्ते मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.ण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. पण, त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जांवरील कार्यवाही थांबली. आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. याशिवाय काही दिवसांत यापूर्वीच्या अर्जांची देखील पडताळणी होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. पण, सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिलनंतर दरमहा २१०० रुपये मिळतील, असेही त्यांनी  सांगितले.

 

 अर्जांची छाननी सुरू

जिल्ह्यातील दहा लाख ४५ हजारांपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांना लाभही मिळाला. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली, त्या काळातील अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती. आता त्या ६५ हजार अर्जांची छाननी सुरू आहे. सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल.

 

– प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!