ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडकी बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का ?

आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई वृत्तसंस्था 

 

राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला भरपूर फायदा झाला. आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या की,  लाडकी बहीण योजना जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे.

तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे. तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितल जात आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!