ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेकडो मुस्लिमेतर बांधवानी जाणून घेतले मशीदीत नेमकं चालतं काय?

अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते मशीद परिचयाचे उदघाटन

सोलापूर : प्रतिनिधी

जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. इस्लाम धर्मियांचा प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबविण्यात येतं आहे.

मुस्लिम बांधवाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असतात. मशीद म्हणजे काय? तिथे काय नेमकं काय केलं जातं? अजान, वजु, नमाज म्हणजे काय? असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवाच्या मनात असतात. याच प्रश्नांची उकल व्हावी, तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी ‘मेक इंडिया बेटर कॅम्पेन’ अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यंदाच्या वर्षी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरानी मशीदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. प्रारंभी जमीयतच्यावतीने सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या उदघाटनप्रसंगी मोनिका सिंह ठाकूर यानी या उपक्रमाची प्रशंसा केल. ‘आज अनेक लोक पुस्तक वाचन न करता केवळ सोशल मीडिय, व्हॉटसअप द्वारे आलेली माहिती वाचून आपला मत ठरवतात. त्यामुळे अनेकदा गैरसमज वाढत असतात. त्यामुळे लोकांनी अशा उपक्रमात सहभागी होऊन स्वतः माहिती जाणून घ्यावी. इस्लामची चांगली शिकवण आणि मस्जिद मध्ये नेमकं काय होतं?, तिथे मुस्लिम काय करतात? हे पाहण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम एक चांगली संधी आहे.‘ असे मत व्यक्त करत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मशिदीस भेट द्यावी असे आवाहन केले.

मस्जिद परिचय हे उपक्रम 15 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान दुपारी 3.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मशीद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे. तब्बल १०५ वर्ष जुनी अशी ही मशीद आहे. हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशीदीत प्रवेश खुला असणार आहे. त्यामुळे सर्वानी मशिदीला भेट द्यावी. असे आवाहन जमीयत ए अहले हदिसचे उपाध्यक्ष अब्दुल अजीज शेख यांनी केले. यावेळी जमीयत ए अहले हदिसचे अध्यक्ष मुख्तार अहमद हुमनाबादकर, सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी, माजी महापौर आरिफ शेख, हाजी हजरत खान मशीदचे ट्रस्टी मुजीब खान हे देखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!