---Advertisement---

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

By team
On: August 17, 2024 9:37 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा”राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01 ते 04 यावेळेत शिवछत्रपती क्रिडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे येथे “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर रूक्मिणी किसन मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, गृह, विधी न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मंत्री, वित्त व नियोजन, मंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम पुणे बालेवाडी येथे होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात पाहता येणार आहे. हा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजनेचे किमान 700 ते 800 लाभार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले व निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!