---Advertisement---

त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करु ; दादांच्या नेत्याने दिले उत्तर

By team
On: September 27, 2024 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

शरद पवार गटाचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी गडबड करायला नको होती. आम्ही सगळे द्यायला तयार होतो. मात्र पक्ष फोडून त्यांनी चूक केली असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी सर्व द्यायला तयार होतो हा त्याचा धादांत खोटेपणा असून, या विषयावर समोरासमोर जाऊन उत्तर देण्यास मी तयार आहे, त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर उघडू करु; असे स्पष्ट शब्दात सुनावले.

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेवेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुळेंनी मुश्रीफांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना पालकमंत्री मुश्रीफ हे अमित शहांना पोहोचवायला गेले होते. यावर टीका करणार्‍यांनी मनमोहन सिंगाचे सरकार असताना अरविंद केजरीवालांनी त्यांच्या मंत्रिमंडळावर किती टीका केली होती. हे माहित असताना त्याच केजरीवालांच्या बैठकांना जे उपस्थित राहतात, त्यांनी भान ठेवायला हवे.

अमित शहा हे देशाचे कणखर नेतृत्व असून, त्यांच्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ भेटण्यास गेले त्यावर टीका करण्याची गरज नव्हती. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढीसाठी प्रचंड मेहनत केली असून, त्यांनी लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पोटशूळ उठल्याने त्यांच्यावर टीका केली जात असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. राजेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत जयसिंग चव्हाण यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!