ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चला मतदान करूया पथनाट्य

मतदान जनजागृतीसाठी राज्यशास्त्र व एनएसएस विभागाचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरु बसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी चला मतदान करूया हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी पसंती व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, या हेतूने सोलापूर जिल्हा निवडणूक साक्षरता मंडळ वर्शिप अर्थ फाउंडेशन पुणे तसेच राज्यशास्त्र विभाग व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी स्टँड, कारंजा चौक बाजारपेठ, स्वामी समर्थ मंदिर परिसरात हे पथनाट्य सादर करण्यात आले. प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे, मतदानाचा हक्क बजावा, तुमच्या एका मताने मजबूत सरकार येणार आहे, लोकशाही बळकट होणार आहे, संविधान मजबूत होणार आहे म्हणून चला मतदान करूया, चला मतदान करूया असा संदेश उपस्थित मतदारांना विद्यार्थ्यांनी दिला. नागरिकांनी देखील पथनाट्यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या पथनाट्य कार्यक्रमास सोलापूर जिल्हा लोकसभा निवडणूक नोडल अधिकारी डाॅ.सुधीर ठोंबरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे, अक्कलकोट अप्पर तहसिलदार श्रीकांत कांबळे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, निवासी तहसिलदार सोमनाथ पवार, पोलिस निरीक्षक महेश स्वामी, स्वीप समितीचे सदस्य जयंत भोसले, निवडणूक साक्षरता मंडळ समन्वयक सोमनाथ पवार एन एस एस कार्यक्रमाधिकारी राजेश पवार आदी उपस्थित होते.या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, पुनम कोकळगी, मल्लिकार्जुन मसुती, रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी कौतुक केले.

विकासासाठी मतदान कर, परगावी जाऊ नको …
शासनाने मतदानानिमित्त सुट्टी जाहीर केली असताना उन्हाचा त्रास सहन होत नाही म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या कुटुंबास गावातील लोक मतदान करण्याची विनंती करतात. गावाच्या विकासासाठी मतदान कर, परगावी जाऊ नको, अशी वारंवार विनंती केल्यानंतर ते कुटुंब मतदान करण्यासाठी प्रेरित होते. अशा आशयाचे पथनाट्य पाहून नागरिकांनी या उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!