अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्रमसंस्कार, त्याग, सेवाभाव, सहनशीलता,नेतृत्वगुण, अशा अनेक संस्कारांची रुजवणूक करताना इतरांसाठी जगायला शिकवणारी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आयुष्याला आकार देते असे मत डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाट्न सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्कलकोट च्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या होत्या. यावेळी मंचावर शिबिराचे उदघाट्क तथा संस्थेचे सेक्रेटरी सुभाष धरणे, सरपंच वर्षा भंडारकवठे, प्राचार्य डॉ. शिवराया अडवितोट, सिद्धाराम भंडारकवठे उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिमापूजन करून शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. वरिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांनी प्रास्तविकातून शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पुढे बोलताना डॉ. बिराजदार म्हणाले, पाठयपुस्तकातून मिळणारे धडे स्वतःला पुढील वर्गात जाण्यासाठी मदत करतात तर एन्. एस. एस. च्या शिबिरातून मिळणारे धडे स्वतःसह अनेकांच्या आयुष्याला आकार देण्याचे बळ देतात. यावेळी प्राचार्य डॉ. आडवीतोट म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरेलं. सात दिवसात गावकर्यांना हेवा वाटेल असे काम करून दाखवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते अंबानप्पा भंगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र्माधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. अशोक माळगे, प्रा. सिद्धाराम पाटील, डॉ. लता हिंडोळे, प्रा. दयानंद कोरे, श्रीराम चव्हाण, प्रा. मधुरा गुरव, डॉ. गीता हारकूड , प्रा. श्वेता पाटील, प्रा. स्नेहा लच्याणे, प्रा. ललिता लवटे, प्रा. आदिलशहा शेख, प्रा. महेश पाटील, प्रा. अभिजित कुंभार, प्रा. चंदन सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कांबळे, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, डी. सी. सी. बँकेचे शन्तय्या स्वामी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. डॉ. लता हिंडोळे यांनी आभार मानले.
नेतृत्व घडवणारी कार्यशाळा
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टिकोन व्यापक बनतो. सर्व क्षेत्रात चांगले नेतृत्व घडवण्यासाठी ही योजना उपयुक्त असल्यामुळे ही योजना नेतृत्व घडवणारी कार्यशाळा आहे.
– शोभाताई खेडगी,माजी नगराध्यक्षा, अक्कलकोट