मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी ही यादी जाहीर केली.
राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, मंत्री अदिती तटकरे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालुद्दीन, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, इंद्रनील नाईक, सुनील शेळके, विक्रम काळे, चेतन तुपे, नितिन पवार, दत्तामामा भरणे, सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी आदींचा समावेश आहे.