---Advertisement---

नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च पर्यंत लॉकडाऊन

Follow Us:
---Advertisement---

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. कोरोनाचे रुग्ण नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला प्रतिसाद मिळाला नाही. नागपुर शहरात लॉकडाऊन काळात मद्य विक्री बंद राहील मात्र लसीकरण, अत्यावश्यक सेवा, डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहतील, असे पालक्मंत्री नितीन राऊत म्हणाले.

नागपूर शहरात १४ तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं.  शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले मात्र रस्त्यावर विना कामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!