---Advertisement---

मोठी बातमी : भाजप मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक !

By team
On: September 20, 2025 2:41 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता महायुती सरकार मधील भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर आज (दि.२०) दुपारी सुमारास दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर येथील कार्यालयासमोर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अंदाजे बारा वाजेच्या सुमारास अतुल सावे आपल्या कार्यालयात असताना, कार्यालयासमोर उभी असलेल्या त्यांच्या गाडीवर एका तरुणाने अचानक दगड फेकला. दगडफेकीमुळे गाडीचे किरकोळ नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत संबंधित तरुण हा मनोरुग्ण असल्याचे समजले आहे. त्यामुळे पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला दवाखान्यात पाठवले असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी परिसरात तातडीने सुरक्षा वाढवून तपासाला सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!