सोलापूर (प्रतिनिधी) दि. ०८ मार्च : शहरातील भुकेलेल्या व्यक्तीला दोनवेळचे जेवण पुरवावे ही संकल्पना एका महिलेने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांना ही कल्पना आवडल्यामुळे लगेच आ. देशमुख यांनी महिला दिनाच्या दिवशीच अन्नपूर्णा योजना सुरू केली. आज या अन्नपूर्णा योजनेचा आठवा वर्धापन दिन आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही योजना यशस्वी झाली आहे. यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य आणि करावे जेणेकरून सोलापूर शहरातील भुकेलेल्या लोकांना दोनवेळचे जेवण मिळेल, असे प्रतिपादन लोकमंगल फाउंडेशनचे उपाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले.
लोकमंगल फाऊंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे समूह संचालक मनीष देशमुख, लोकमंगल फाउंडेशन संचालक, मोहन आलाट, शशी थोरात, नगरसेविका राजश्री चव्हाण उद्योजिका गीता राजानी ओमप्रकाश हिरेमठ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओमप्रकाश हिरेमठ, नगरसेविका राश्री चव्हाण उद्योजिका गीता राजानी यांनी अन्नपूर्णा योजना गरिबांसाठी वरदान ठरली असल्याचे सांगितले. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून अन्नपूर्णा योजनेतील स्वयंपाकी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या आठ वर्षांपासून लोकांना घरपोच डबा पोहोच करणार्या रिक्षाचालकांचाही शहाजी पवार आणि मनिष देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक, बालाजी शिंदे, श्रीकांत ताकमोगे, अतुल गायकवाड, सोमनाथ केंगनाळकर, प्रथमेश कोरे, अक्षय अंजीखाने आदींसह लोकमंगनचे कर्मचारी उपस्थित होते.