अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली महाप्रसाद, यात्रीनिवास, यात्रीभूवान यासह विविध उपक्रम हे लाखो स्वामी भक्तांच्या सेवेर्थ सज्ज असून, या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त राज्यातील विविध भागातून दिंडी व पालख्या श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये दाखल होतात, यांची देखील सोय करण्यात आलेली आहे.
दिनांक ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसाद पूजा, धार्मिक विधी संपन्न होणार आहे. यानंतर आलेल्या भक्तांना महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
तीर्थटणातून पर्यटनबाबत न्यासाच्या परिसरात दत्त मंदिर, स्वामींचा रथ यासह श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदात्यांचे कक्ष, स्वामी सदन- धान्य कोठार, सभागृह, कार्यालय, सिंहांनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य उभी ३० फुटी मुर्ती, दिपमाळा, वारूळातून प्रकटले परब्रम्ह, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर इमारत, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांग रुग्णांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो उद्योन, जॉगिंग ट्रॅक, वाहन तळ, भक्तांची सोय, याबाबत तीर्थ क्षेत्र नगरीतील विविध मुख्य मार्गावर कटाऊटस् लाऊन स्वामीं भक्तांना सुलभ व्यवस्था होण्या कामी अन्नछत्र मंडळाकडून सोय करण्यात आली आहे.
वातानुकूलित महाप्रड गृह : उन्हाचा पार हा वाढत चालल्याने महाप्रसाद गृह हे एयर कुलर सिस्टिमने सज्ज करण्यात आले असून, स्वमिभक्तांच्या सेवेर्थ न्यासाने सदरचे यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.