ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी घेतली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांसमवेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसिध्द केली आहे. त्यात ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहेत.

पवार यांच्या भेटीत महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसपुशीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक बाबत, तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत देखील या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!