---Advertisement---

अक्कलकोटमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम सुरु, तालुका युवक काँग्रेसचा पुढाकार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबवून केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. याचा भाग म्हणून प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे व माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या आदेशावरून अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसवतीने हे आंदोलन करण्यात आले.

स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचा नेतृत्वाखाली व अक्कलकोट युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. महिला काँग्रेस शहराध्यक्ष सुनीता हडलगी यांनी प्रथम स्वाक्षरी केली. ही स्वाक्षरी मोहीम अक्कलकोट बस स्थानक व पेट्रोल पंप या ठिकाणी राबविण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.पेट्रोल, डिझेल, गॅस व महागाईवर नियंत्रण नाही. नियंत्रण न आल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक विकास मोरे, वसीम कुरेशी, अयाज चंदनवाले, सुनील खवळे, शिवशरण इचगे, जगदीश माळी, आकाश निंगदल्ली, संदीप नवले, बसवराज अल्लोली, कुपेंद्र अरेनवरू, वसीम बागवान, मुद्दसर शेख, मल्लिनाथ दिंडुरे, सतीश कोळी, धनराज येळमेली, एम.जी.शेख, सतीश चिंचोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!