ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींसह देशभरातील नेत्यांची उपस्थिती राहणार

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था

५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेसाठी शपथविधी होणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी केली. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक घोषणा झालेली नाही.

या यादीनुसार या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून, मंजुरीही घेण्यात आली आहे. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजप मुख्यालयात महाराष्ट्रात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नेत्यांकडून प्रवासाची तिकिटे काढण्यास सुरुवात झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी ही बैठक झाली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक तेलंगणातील पक्ष संघटनेबाबत होती. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता या बैठकीकडे राज्याच्या संदर्भात पाहिले जात होते. मात्र या बैठकीत महाराष्ट्रासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. या बैठकीदरम्यान नड्डा यांनी हसत हसत तावडे यांना माध्यमांतील लोक या बैठकीला महाराष्ट्राच्या संदर्भाशी जोडून तुम्हाला प्रश्न विचारतील, असे म्हटेल असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!