---Advertisement---

ब्रेकिंग.. भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

By team
On: December 4, 2024 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

भंडारा वृत्तसंस्था 

आज पहाटे पहाटे भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे.

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिलेल्या माहितीनुसार,  भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची झालेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल.  अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा.

महाराष्ट्राशी लागून असलेल्या तेलंगाणा या राज्यातील मुलुगू हा या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. महत्त्वाचे म्हणजे याआधीही याच भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यावेळी मात्र भूकंपाची तीव्रता अधिक होती. परिणामी या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बसले. यात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही इतर राज्यांच्या सीमेवरही हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हे घटना घडल्या आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!