ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशात सर्वात स्वच्छ महाराष्ट्राने मारली बाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा निकाल केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सुरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राची नवी मुंबई, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे विशाखापट्टणम आणि पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे भोपाळ आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते. गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांत वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला. यावेळी एकूण 9500 गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार चंदीगडला देण्यात आला. 2022 मध्ये मध्य प्रदेश राजस्थान-महाराष्ट्राला मागे टाकून देशातील सर्वात स्वच्छ राज्य बनले होते. 100 हून अधिक शहरे असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी इंदूरने क्लीनिंग सिक्सर लावला होता. भोपाळही सातव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहे. 2017 आणि 18 मध्ये भोपाळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!