---Advertisement---

उद्धव ठाकरेंवर आ.राणेंची जोरदार टीका !

By team
On: January 11, 2024 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात नुकतेच आमदार अपात्र प्रकरणी निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर आता भाजपचे आ.नितेश राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नीतेश राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा असे म्हटले होते. हे शब्द केवळ आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पाळला जेवढा त्यांच्या भावानी त्यांना सांभाळले नाही तिवढे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घरातील एक सदस्य म्हणून चांगले नाते जोपासले होते हे काल उद्धव ठाकरेंना आठवले असेल. हे जे दिवस दिसत आहे याचे कारण एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंसारखी माणसे ओळखण्याचा गुण उद्धव ठाकरेंमध्ये नसल्याने ते रसातळाला गेले आहे. मातोश्रीत बसून जे किचन कॅबिनेट चालवणाऱ्यामुळे हे सगळे घडले आहे. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना बाजूला केल्यानेच हे दिवस पाहायला मिळत आहे.

नीतेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना या वाताहतीला दोन आनिल आणि भांडूपचा शंकुनी मामा जबाबदार आहे. ज्यांनी स्वत: चे दुकान चालविण्यासाठी शिवसेना संपवून दाखवली. उद्धव ठाकरेंना बरबाद करुन टाकले, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी जवळ केले. म्हणून काल पत्रकार परिषद घेताना उद्धव् ठाकरे एकटे बसल्याचे दिसून आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!