ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरुवात होत आहे. एक ते दहा मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी दिवसांचे घेत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

राज्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एक ते दहा तारखेपर्यंत ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. हे अर्थसंकल्पी अधिवेशन वादळी ठरण्यासाठी अनेक मुद्दे विरोधी पक्षाच्या हातात आहेत. मराठा आरक्षण, वीजबिल माफी, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, असे अनेक मुद्द्यवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

वन मंत्री संजय राठोड यांच्यामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांचा राजीनामा मागण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!