ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत महायुतीचे अर्ज दाखल !

अक्कलकोटमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मिलन कल्याणशेट्टी यांचा अर्ज

अक्कलकोट :  प्रतिनिधी

तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले.अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जनता पक्षावरील विश्वास व्यक्त केला. अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

 

 

 

तसेच, अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक प्रशासनासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.या रॅलीत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, महेश हिंडोळे, शिवशरण जोजन,आप्पासाहेब बिराजदार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्कलकोट येथे भारतीय जनता पक्ष व महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी युवा नेते मिलन कल्याणशेट्टी, मैंदर्गीमध्ये अंजलीताई बाहेरमठ,दुधनीमध्ये अतुल मेळकुंदे यांनी अर्ज भरला आहे. तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,
असा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!