भारतीय वस्त्रोद्योग कलेला पंतप्रधान मोदींमुळे प्रोत्साहन : हिंडोळे;अक्कलकोट शहरात हातमाग विणकर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप
अक्कलकोट, दि.८ : मेक इन इंडिया अंतर्गत पारंपरिक भारतीय वस्त्रोद्योग कलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले असून त्यांच्यामुळेच या कलेला खऱ्या अर्थाने पुनर्ववैभव प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन नगरपालिकेचे माजी पक्षनेते महेश हिंडोळे यांनी केले.
अक्कलकोट शहरातील राम गल्ली येथे वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने ४५ दिवशीय हातमाग विणकारांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते.प्रशिक्षण कालावधीत सर्वांना प्रत्येकी तीनशे रुपये मानधन दिले गेले.यानिमित्त प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विणकर दिनाचे औचित्य साधुन हिंडोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका महिला अध्यक्षा सुनंदा अष्टगी,दयानंद बिडवे, विजयकुमार मलंग यांच्या हस्ते करून कार्यक्रम प्रारंभ झाला.देशाच्या ग्रामीण भागात हातमाग विणकर मोठ्या प्रमाणात आहेत. महिला सबलीकरण करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले होते.प्रशिक्षण देऊन महिला व पुरुष सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे.पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगला उपक्रम महिलांना उद्योग मिळावा व प्रत्येक हाताला काम मिळावे यासाठी सुरू केला आहे.यातून आपली भारतीय संस्कृती,कला याचे जतन व संवर्धन होणार आहे. विणकर लोकांना प्रोत्साहन मिळावे व मानधन मिळावे या उद्देशाने जी काही योजना केंद्र सरकारने चालू केली आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा,असे आवाहन हिंडोळे यांनी केले.यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सुरक्षा किट देण्यात आले. याप्रसंगी धनंजय गडदे ,कैलास मलगोंडा, सचिन स्वामी ,सुवर्णो गडदे ,सुवर्णा रामशेट्टी , रोहिणी मलगोंडा, संगम्मा मलगोंडा, कविता भोसले आदींसह
शहरातील महिला वर्ग व प्रशिक्षणार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.