अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती महिबूब मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कडबगाव येथे जल्लोष करण्यात आला.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशान्वये ही निवड करण्यात आली आहे.या संदर्भातील पत्र तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी त्यांना दिले.ही समिती शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात समितीची नियुक्ती रखडली होती.शिंदे – फडणवीस सरकार येताच या समितीची नियुक्ती करण्यात आली.यात मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी म्हणून निजप्पा गायकवाड, महिला अशासकीय सदस्य – ज्योती उणणद,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी – सिद्धाराम माळी, सुनील सावंत, सर्वसासाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी – नागेश सिंदगी,नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था शासकीय प्रतिनिधी – दयानंद उंबरजे,सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून ओम गंगोंडा, तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी म्हणून महादेव बडुरे,शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे,तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मुल्ला यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी संजय गांधी निराधार योजनेवर पाच वर्ष अध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे.आता पुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून या योजनेपासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय देऊ
आणि या योजनेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू,असा विश्वास नूतन अध्यक्ष मुल्ला यांनी व्यक्त केला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.