ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवपुरी आश्रमातील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले यांचे निधन

अक्कलकोट : प्रतिनिधी

येथील शिवपुरी आश्रममधील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले (वय ६५) यांचे रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, एक मुलगी, सून व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.

मालादेवी या श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरु परंपरा पीठ गुरुमंदिरचे पिठाधीष तसेच विश्व फाऊंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट चे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने संपूर्ण विश्वातील अग्निहोत्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कार आज संध्याकाळी ५:३० नंतर शिवपुरी (ता.अक्कलकोट )येथे होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!