मुंबई, वृत्तसंस्था
काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला. यामध्ये छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का? घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नाही. मराठा राक्षणाच्या मारेकऱ्याचंं आम्हाला काही देणं घेणं नाही. असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर फार बोलणं टाळलं आहे. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही जरांगेंनी यावेळी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केली.