जालना वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघामध्ये लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली मात्र लगेच दुसऱ्या दिवशी माघार घेतली होती. मराठा उमेदवार निवडून आला नाहीतर लढ्याचं हसू होईल, अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली होती. पण आता 10 नोव्हेंबरला आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करणार अशी असं जरांगेंनी सांगितलं आहे.
जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
‘आमचा वर्ग तुम्हाला मानणारा आहे. मात्र तुम्ही आरक्षणावर काही बोलू नये. समाजाचं अस्थित्व आणि आरक्षण कसं मिळवायचं ते मी पाहतो. तुमच्यासारखं अस्तित्व गमवून बसणारा मी नाही. त्यामुळं तुम्ही या भानगडीत पडू नका. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत मराठा समाज योग्य भूमिका घेईल, असं सांगत येणाऱ्या दहा तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करणार. शिवाय शेवटच्या दोन दिवसातही मराठा समाज कार्यक्रम लावू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांनी दावा केला होता की, जरांगे यांना उमेदवारांची यादी आधीच दिली होती, असं म्हटल्यानंतर जरांगे यांनी राजरत्न यांचा विषय संपलेला आहे, असं म्हणत त्यावर बोलण्यास नकार दिला आहे.