ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“निवडणुकीच्या मैदानात असतो तर..”, मनोज जरांगेंचा मोठा दावा

पंढरपूर वृत्तसंस्था 

 

मनोज जरांगे पाटील यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रत्यक्ष लढवण्याची घोषणा केली होती. पण ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. पण निवडणूक होऊ निकाल जाहीर झाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ‘मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता.’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासफा केला असता. मी मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही.’ गोरगरीबांना शक्ती मिळावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा असे आपण विठ्ठलाकडे साकडे घातले असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. तसंच, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर समाजाची बैठक बोलावून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे ही जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!