मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणारे मनोज जरांगे पाटील हे रविवारी मात्र निवांत दिसले यावेळी त्यांनी आंतरवालीसराटी येथे क्रिकेट खेळले. त्यांनी १५ धावा काढल्या. तसेच निर्णायक विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, तब्येत खालावल्याने सायंकाळी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले.
आंतरवाली सराटी येथे रविवारी मनोज जरांगे यांनी बॅट, बॉल हातात घेत क्रिकेटर म्हणून मैदान गाजवले.जरांगे ज्या टीमकडून खेळले त्यांचे ओपनिंग बॅट्समनहोते. यात त्यांनी चार ओव्हरपर्यंत खेळून एक चौकारमारला. या व्यतिरिक्त ११ धावा काढल्या. संघाच्या १२ओव्हरमध्ये एकूण ५१ धावा झाल्या होत्या, तर दुसऱ्याटीमच्या बॅटिंगदरम्यान त्यांनी अंतिम टप्प्यातील ओव्हरघेत एक चौकार देऊन निर्णायक विकेट घेत आपल्यासंघाला ४ धावांच्या फरकाने विजय मिळवून दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेपाटील हे आंदोलन करीत आहे.आरक्षणासाठी सभा अन् मैदान गाजवणाऱ्या जरांगे पाटलांच्याखेळीने मैदानावरील तरुणहीचांगलेच अवाक् झाल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांनीरात्रीच्या कीर्तनाचा समारोपझाल्यानंतर आंदोलनस्थळीतरुणांबरेाबर चर्चा सुरू असतानाउद्या क्रिकेट खेळायला येणारअसल्याचे सांगितले. रात्रीठरल्यानुसार सरपंच पांडुरंगतारख यांच्याबरोबर पांढरापोशाख, जॅकेट अन् पायात शूजघालून जरांगे पाटील सकाळीसहा वाजता मैदानावर दाखलझाले. त्यांनी बॅटिंगकरण्याबरोबरच बॉलिंगकरण्याचाही आनंद लुटला. मनोज जरांगे यांच्या बरोबर आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख पाटलांनीसकाळी सहा वाजता हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून दौरेतसेच सभा सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांना व्यायाम करताआला नाही. यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून मैदानावर थोडी कसरतकरायची असल्याचे तरुणांना त्यांनी सांगितले होते.