ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनेकांना होवू शकते आज धनलाभ ; आजचे राशिभविष्य !

मेष : आर्थिक बचत करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

वृषभ : आर्थिक चणचण भासेल. ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

मिथुन : आर्थिक आघाडीवर सुधारणा. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.

कर्क : आर्थिक तणाव येईल. पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

सिंह : मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. तुमचे वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

कन्या : विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आर्थिक दबावात येऊ शकता. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा.

तूळ : धन लाभ होण्याची शक्यता. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. आवडते काम करण्याची तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.

वृश्चिक : दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

धनु : धन लाभ होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.

मकर : धन लाभ होण्याची शक्यता. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा.

कुंभ : धन लाभ होण्याची शक्यता. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील.

मीन : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी ते तुमच्यासाठीच तयारी करत होते कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!