ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठे उद्या मुंबई निघणार : २६ जानेवारीला करणार आमरण उपोषण !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत आहे. गेल्या काही दिवसापासून सरकार त्यांना आश्वासन देत असल्याने सरकारने फसविले असा आरोप देखील त्यांनी केला आहे, मात्र मनोज जरांगे पाटील उद्या 20 जानेवारी रोजी मुंबईत निघाणार आहे. उद्या मराठे मुंबई निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे. मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघावे. मराठे भीत नाहीत आणि आम्ही गुन्हे दाखल होण्यास भीत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, 26 तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहेत. मी मारायला भीत नाही. मी मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. आपण शांततेत चाललो आहोत. पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जे ठरले आहे त्या मार्गाने मराठा समाज मुंबई जाणार आहे. आता आम्ही निघालो आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आतापर्यंत दोन उपोषण झाले. हे आरक्षणासाठी शेवटे उपोषण असणार आहे. सर्वेक्षण व्हायला पाहिजे आम्ही ते नाकारले नाही पण ते टिकले पाहिजे. सुप्रीम कोर्टाकडून मिळणाऱ्या आरक्षणामुळे नुकसान होणार आहे. आता एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. बचू कडू हे प्रामाणिक आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन ते पाळतात. यापूर्वी जे उपोषण सोडायला आले होते त्यांना मराठ्यांची गरज नाही का..? मग 54 लाख नोंदीच्या आधारे त्यांच्या सग्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का देत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. आता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले पाहिजे. शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजे. आता 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!