अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातून काम करणाऱ्या पत्रकार मारुती बावडे यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून गौरव होणे हि बाब अक्कलकोटकरांसाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी केले.
नागनळळी येथील आश्रमशाळा शिक्षण संकुलात मारुती बावडे यांना ग्रामीण पत्रकारीतेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा द पिलर ऑफ हिदुस्थानी सोसायटी हा पुरस्कार मिळाल्याबददल व मंगरुळे प्रशालेतील सहशिक्षक अभिजीत लोके यांनी शंभर वेळा रक्तदान केल्याबददल त्यांचा यथोचित सन्मान संस्थचे सचिव जावेद पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सिद्धे यांनी मारुती बावडे यांची पत्रकारिता तालुक्यासाठी विविध घटकांसाठी पोषक ठरली आहे त्याचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार असून त्यांनी या पुढच्या काळातही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा चालू ठेवून यश मिळवावे, असे सांगितले.या सन्मान सोहळयाचे अध्यक्षपद संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी भूषविले. पटेल यांनी देखील बावडे आणि अभिजीत लोके यांच्या कार्याचा गुणगौरव करून तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाजू, पत्रकार चेतन जाधव, रमेश भंडारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन चव्हाण, प्राचार्य आय.एम.मुजावर उपस्थित होते.
प्रशालेतील विदयार्थीनी ऐश्वर्या चव्हाण हिने तिच्या मनोगतात संस्थेचे सचिव जावेद पटेल यांना ईश्वरीय उपमा दिली. सत्कारमूर्ती मारुती बावडे यांनी पत्रकारीतेच्या खडतर प्रवासाबददल विदयार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच अभिजीत लोके यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान कसे हे सांगून विदयार्थ्यांना आरोग्यविषयक बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जगताप सर, प्रास्ताविक गुरव, पाहुण्याची ओळख बशेटटी यांनी तर आभार बिराजदार यांनी केले