अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हिराबेन मोदी यांचा जीवन प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतांना त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपली मुले ही शिक्षित व्हावी या साठी त्यांनी अनेक कष्ट सहन करत त्यांना मोठे केले. जाणून घेऊयात हिराबेन मोदी यांचा जीवन प्रवास.
मोदी यांच्या मातोश्री हिराबेन या मोदी यांचे लहान बंधु पकंज मोदी यांच्या सोबत गांधीनगर येथे रायसन या गावी राहत होत्या. हिराबेन यांचे जीवन लहानपनापासून संघर्षाचे राहिले आहे. त्या अतिशय शिस्तबद्ध जीवन जगत होत्या. हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला. त्यांचे लग्न जेव्हा झाले तेव्हा त्या अवघ्या १५ ते १६ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर त्या वडनगरला येथे राहण्यास आल्या.
हिराबेन यांची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपली मुले ही चांगली शिकावी ही त्यांची इच्छा असल्याने त्यांनी अनेक खस्ता खात मुलांना शिकवले. शाळेची फी देण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नसल्याने त्यांनी इतरांकडे घरकाम देखील केले. एव्हढेच नाही तर त्यांनी सूत कताईचे काम देखील केले. त्यांनी स्वत: काम केले पण इतर कोणाकडून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी इतर कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी मुलांना मोठे केले.
आई हिराबेन यांना सर्व प्रकारचे घरगुती उपचार माहित होते. अनेक महिला आईला त्यांच्या समस्या सांगत असत. हिराबेन अशिक्षित नक्कीच आहेत, पण त्यांना गावात डॉक्टर म्हणायचे. ते घरगुती उपचार करून अनेकांना आजारमुक्त करायचे अशी माहिती, मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एका मुलाखतीत दिली होती.
आई हिराबेन यांना सर्व प्रकारचे घरगुती उपचार माहित होते. अनेक महिला आईला त्यांच्या समस्या सांगत असत. हिराबेन अशिक्षित नक्कीच आहेत, पण त्यांना गावात डॉक्टर म्हणायचे. ते घरगुती उपचार करून अनेकांना आजारमुक्त करायचे अशी माहिती, मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एका मुलाखतीत दिली होती.
हिराबेन सकाळी लवकर उठत. पहाटे ४ वाजता पासून त्या काम सुरू करत असे. यानंतर त्या सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा विहिरीतून पाणी भारत असे. तब्बेतीची त्या विशेष काळजी घेत असे. बाहेरचे खण्यापेक्षा त्या घरी स्वत: जेवण बनवून आहार घ्यायच्या. त्यांना आईस्क्रिम खूप आवडत असे. यासाठी ती कधीच नकार देत नाही. त्या नेहमी कामात व्यस्त राहायच्या असे देखील मोदी यांनी मुलाखतीत सांगितले. हिराबेन यांच्या आईचे त्या लहान असतांना स्पॅनिश फ्लूच्या साथीने निधन झाले. त्यांचे बालपण आईशिवाय गेले. परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन लिहिता वाचायलाही जमले नव्हते. उदरनिर्वाहसाठी त्यांनी इतरांच्या घरी धुणीभांडीची कामे देखील केली. तर घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्यासाठी त्या वेळ काढायच्या.