ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चांगले विचार तुम्हाला लाभ मिळवून देणार !

आजचे राशिभविष्य दि.१३ एप्रिल २०२५

मेष राशी

आज आराम मिळेल. मनोरंजनासाठी चांगली रक्कम खर्च कराल. तुमच्या नव्या योजनांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. भविष्यासाठी थोडीशी बचत करण्याचा विचार करा. बऱ्याच दिवसांनी एखाद्या नातेवाइकाला भेटण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. आज जिवावरचं संकट टळेल.

वृषभ राशी

नशीब आज तुमच्या दारात पाणी भरेल. कोणत्याही व्यवसाय भागीदारीत सहभागी होण्याआधी नीट विचार करा. विचार न करता कोणालाही पैसे देण्याचे आश्वासन देऊ नका, अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. निर्णय हुशारीने घ्या. जर तुमच्या मुलाने शिक्षणाशी संबंधित परीक्षा दिली असेल, तर त्यात चांगले यश मिळेल.

मिथुन राशी

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस नरमगरम असेल. आहारावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या पुन्हा उभ्या राहू शकतात. प्रेयसीमुळे घरात ताणतणाव वाढेल. मानसिक त्रास होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. मनातील गोंधळातून बरीचशी सुटका होईल.

कर्क राशी

नवीन घर, दुकान खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. जे काही काम सुरू कराल त्यात यश निश्चित मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाल. सकारात्मक विचार तुम्हाला सन्मान मिळवून देईल. जर एखादे काम पैशांमुळे अडकले असेल, तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. पण एका निर्णयाबद्दल पश्चाताप होईल. व्यवसायात दबाव राहील आणि सरकारी टेंडर मिळू शकते. करिअरमधील समस्या दूर होतील. मित्राने सूचवलेल्या गुंतवणुकीच्या योजनेवर विचार करूनच गुंतवणूक करा. परदेशात जाण्याचा योग आहे. अधिक खर्च टाळा.

कन्या राशी

आज जे काही काम हाती घ्याल त्यात सकारात्मक परिणाम मिळतील. राजकारणात असलेल्यांनी काळजीपूर्वक पुढे जावं. कोणालाही अनावश्यक सल्ला देणे टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून निराशाजनक बातमी मिळू शकते. व्यवसायात कोणतीही चूक नुकसान करू शकते. कामाच्या व्यापामुळे व्यस्त राहाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ राशी

आर्थिक विवंचनेतही कर्ज घेणे टाळा. वाहन काळजीपूर्वक चालवा. व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल. पण काही गुप्त शत्रू तुमच्या मित्राच्या रूपात असू शकतात, ज्यांना ओळखणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. बायकोची कुरबुर सुरू होईल. प्रेयसीसोबत डेटिंगला जाताना जपून. खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

आज अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे समस्या निर्माण होतील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा योग आहे. लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला जावं लागेल. शेतीत मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु राशी

कायदेशीर बाबतीत विजय मिळेल. कौटुंबिक अडथळे दूर होतील. जोडीदार तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. भूतकाळातील चुकांमधून शिकणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात संयमाने काम करा. कोणत्याही अमिषाला भूलू नका. मैत्री तुटण्याची शक्यता आहे.

मकर राशी

आजचा दिवस सामान्यच असेल. घरच्यांच्या समस्या ऐकायला वेळ काढा. एका विचित्र कामात व्यस्त राहाल. भूतकाळातील चुकांमधून शिका. कोणतेही व्यवहार तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. मुले कदाचित कुठल्या कामासाठी बाहेर जातील. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ राशी

तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करा. वादविवाद टाळल्यास फायद्यात राहाल. तुमची सर्जनशीलता वाढेल. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या. गावाकडे जाण्याचा योग आहे. घरी लग्नकार्य आयोजित केलं जाईल. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मीन राशी

चांगले विचार तुम्हाला लाभ देतील. वेळेवर काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. लोकांविषयी नकारात्मक विचार करू नका. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होईल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न फळ देईल. इतरांसमोर गोष्टी उघडपणे बोलणे टाळा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group