---Advertisement---

मयुरेशने देशात पटकवला आठवा क्रमांक ; सोलापूरचा देशात डंका !

By team
On: October 1, 2025 5:05 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

आज सोलापूर जिल्हावासीयांना आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस (ISS) 2025 या अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात सोलापूरच्या मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक मिळवत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. विशेष बाब म्हणजे, या परीक्षेतील 12 जागांसाठी देशभरातून सुमारे 4 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात मयुरेश हे महाराष्ट्रातील एकमेव यशस्वी उमेदवार ठरले आहेत.

जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत मयुरेश यांनी आपल्या मेहनतीने आणि अभ्यासपूर्ण तयारीने हे यश संपादन केले. सध्या ते आपले वडील, अलिबाग येथील अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते, आणि मयुरेश यांनी या कौटुंबिक प्रशासकीय परंपरेला पुढे नेत IES परीक्षेत यश मिळवले आहे. या यशामुळे मयुरेश यांची केंद्रीय वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांसारख्या उच्चपदस्थ संस्थांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

मयुरेश यांनी आपले प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील सुयश विद्यालयात पूर्ण केले, तर बारावीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!