ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आजचं विषय नाही; छगन भुजबळ !

मुंबई : वृत्तसंस्था

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी स्पष्ट केले की, पक्षाच्या दोन गटांचे विलीनीकरण सध्या त्यांच्या आघाडीवरचा विषय नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी म्हणाले, “रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आज, महिन्याने किंवा दोन महिन्यांनी करता येईल. घाई करण्याची काहीही गरज नाही.”

भुजबळांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे हलचाल झाले आहेत. शरद पवार गटाने 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करण्याचा दावा केला होता, परंतु अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, सध्या पक्षाचे प्राधान्य सुनेत्रा पवार स्थिर होणे आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीसाठी तयारी करणे आहे, न की विलीनीकरणाची घाई.

भुजबळ पुढे म्हणाले, “तिथे नवीन कॅप्टन आलेत. त्यांना बसू द्या, काम करू द्या. त्यानंतर पाहूया काय करायचे. आज आमच्यापुढे हा विषय नाही. सुनेत्रा पवार स्थिर होणे व पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणे हाच प्राधान्यक्रम आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निश्चित आहे आणि याबाबत शंका घेण्याची काही गरज नाही. तसेच, पक्षाकडून शरद पवार गटाला कोणताही प्रस्ताव देण्याबाबत सध्या काही निर्णय झालेला नाही. भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले की, “आज ठरलेच पाहिजे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. रोज घाई करून विलीनीकरणावर चर्चा करणे योग्य नाही; थोडे थांबणे आवश्यक आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!