अक्कलकोट : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि मुळचे मैंदर्गीचे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेची प्रगती पाहून शाळेला शालेय साहित्य देऊन सहकार्य केले आहे. एका छोट्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात पाटील यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना ॲड. पाटील म्हणाले,श्रीमंतांची मुले मोठ्या शाळेमध्ये शिकतात.ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुविधा नसल्यामुळे मुलांची हेळसांड होते.ती दूर झाली पाहिजे.
त्यासाठी समाजाने देखील पुढे येऊन शाळांच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे,असे ते म्हणाले. शाळेचे इतर साहित्य,बगीचा,पटांगण, रंगरंगोटी बघून समाधान व्यक्त केले.या शाळेत खास करून एड. पाटील यांनी शाळेची परसबाग, पाण्याची व्यवस्था,विज्ञान विभाग,संगणक कक्ष, मुख्याध्यापक कार्यालय ,मध्यान भोजन व्यवस्था या सर्व गोष्टी पाहून कौतुक करत इतर शाळांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.या धर्तीवर तालुक्यात सर्व जिल्हा परिषद शाळा निर्माण केल्या तर भविष्यात जिल्हा परिषद शाळा अग्रेसर राहतील, असेही त्यांनी सांगितले. या शाळेला ग्रामस्थांचा मोठा हातभार लागत आहे,सर्वांचे सहकार्य आहे,असे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी सांगितले.या कार्यक्रमात ॲड.पाटील यांनी स्पीच बॉक्स(डाईस बोर्ड) भेट म्हणून दिला.यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.