---Advertisement---

…ते मराठी माणसाला हरवण्यासाठी लढताय ; खा.सुळे !

By team
On: September 26, 2024 2:58 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना नुकतेच राज्यातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

खा. सुळे म्हणाले कि, किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठाच प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शहांसोबत बघितला, असे देखील म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शहांनी टीव्हीवर येऊन सांगितले पाहिजे की, हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला; तो खोटा होता. एवढे तरी अमित शहा यांनी खरे बोलावे, असे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंदूक घेऊन फोटोवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही काही सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी आम्ही ते करु. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे.

अमित शहांनी स्वत: कबुल केले की ते स्वत:हून जिंकू शकत नाही. त्यांचे एकच लक्ष्य आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हरवायचे. त्यांनी काहीच केले नाही हाच याचा अर्थ आहे, आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी लढतो आहोत आणि भाजपचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी लढत आहेत.मराठी माणूस मोठा होतोय हे त्यांना पाहावले जात नाहीये, म्हणून त्यांच्या पराभवासाठी हे लोकं लढत आहे. 5 वर्षांपूर्वी देखील अशीच शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली होती याची आठवण सुप्रिया सुळेंनी करुन दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!