नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या मुद्यावरून सल्ला दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय फायदा होणार आहे? अस सवाल करत त्यापेक्षा ज्या-ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत तिथे त्यांनी या संदर्भात आवाज उठवला तर फायदा होईल, असा सल्ला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मग मोर्चा कोणाच्या विरोधात काढणार असा सवालही मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.