छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना या सभागृहात अनेक विषयांवर गंभीर चर्चा झाली यात औरंगजेबाची कबर उखडली पाहिजे यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले यात आता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांची शनिवारी भेट घेतली. शिरसाट यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या वेळी शिरसाट म्हणाले की, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असून त्यावर चर्चा झाली. शिंदे समितीचे काम सुरू नसल्याचे जरांगे यांनी लक्षात आणून दिले. तीन गॅझेटबाबत नोटिफिकेशन काढले नाही, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत सोमवारी मुंबईत गेल्यावर बैठक बोलावता येते का पाहतो. या बैठकीत हे मुद्दे मांडू.तसेच आमची भूमिका औरंगजेबाची कबर उखडली पाहिजे. अबू आझमीकडे घेऊनजाऊ. आझमीचे निलंबन रद्द होणार नाही. पद निलंबित कसे होईल हे आम्ही पाहू, असे शिरसाट म्हणाले.
वक्त बोर्डाला पैसे पुरवतात.कबरीला पैसे पुरवतात. इथे जमते. केवळ आमच्या-आमच्यात भांडण लावून देतात. ४० वर्षे कुठे गेलेहोते? मनपा निवडणूकतोंडावर ठेवून औरंगजेबाचीकबर काढायची अन् बोलायचेसुचते. औरंगजेबाने तिकडून येऊन इथल्या मुसलमानांना डाग लावला. आम्हाला माहिती आहे, औरंगजेब किती नालायक होता. आम्हालामाहिती आहे, कबर केव्हाकाढायची. आमचे मावळे आहेत,असे म्हणत मराठा नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला टोलालगावला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या वेळी जरांगे यांनीशनिवारी माध्यमांशी संवाद साधला.जरांगे यांना औरंगजेबाची कबरकाढण्यावरून सुरू असलेल्यावादावर विचारले. या वेळी जरांगेम्हणाले, ४० वर्षे कुठे गेले होते?आता तोंडावर महानगरपालिकेच्यानिवडणुका आल्या आहेत. त्यामुळेविषय काढला जात आहे, असेम्हणत राज्य सरकारला खडसावले.