“आमचा जन्म ही महाराष्ट्रातच आणि मृत्यूही महाराष्ट्रातच” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा इशारा
सचिन पवार
कुरनूर दि.२५ अक्कलकोट जरी कर्नाटकच्या सीमेलगत भाग असला तरी अक्कलकोट कधीच कर्नाटकमध्ये सामील होऊ देणार नाही. आणि सीमा लागत भाग असल्याने येथील बरेच लोक कन्नड बोलतात याचा अर्थ असं नाही की आम्ही कर्नाटक मध्ये सामील होऊ इच्छितो. याचा वेगळा अर्थ काढून जर तुम्ही अक्कलकोटला कर्नाटकात जोडण्याचा प्रयत्न केला केला तर आम्ही कदापिही शांत बसणार नाही. असा इशारा अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टीयांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना दिले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीसगावावर आपला दावा केला. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध करत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट व सोलापूरवरही आपला दावा केला आहे. त्यामुळे आज अक्कलकोटमध्ये तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे.
या अनुषंगाने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सुद्धा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. तुम्ही अक्कलकोटला कर्नाटकला जोडण्याचा विचारही करू नका, अन्यथाचे वेगळे परिणाम होतील. असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हंटले आहेत.
पुढे कल्याणशेट्टी बोलताना म्हणाले की, आमचा जन्म आणि मृत्यू हा महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने हा गैरसमज काढून टाकावा. असे वक्तव्य करू नये, असे ते म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो असे यावेळी आमदार कल्याणशेट्टी म्हणाले.