ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात भाजपला धक्का.. माजी आमदार ठाकरेंच्या गटात

सोलापूर वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.पाटील यांचा अचानक ठाकरे गटात प्रवेश करणे हा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का आहे. पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने देशमुख यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधले. यावेळी पाटील म्हणाले की, भाजपात गेलो ती माझी वाट चुकली. सोलापूरचे दोन्ही आमदार काही कामाचे नाहीत. सोलापूरला भकास केले. दोन्ही देशमुखांच्या भांडणात सोलापूर भकास झाले. स्वतः च मंगल म्हणजे लोकमंगल, तंबाकू घ्यायचा आणि चुना लावायचा हेच काम या लोकांनी केले, अशी टीका पाटील यांनी केली.

दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार करायला मी इथे आलो आहे. शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे आमच्या कुटुंबातला आमदार झाला. फडणवीस यांनी मला पद देतो म्हणाले होते, मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता बचेंगे तो और भी लडेंगे, एका समाजावर आमदार कोणी होत नाही, त्याला कष्ट करावे लागतात आणि घाम गाळावा लागतो, असे शिवशरण पाटील म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!