ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत राजकीय पक्षांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यायला हवी असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शेजारची राज्ये महाराष्ट्राच्या घशात हात प्रकल्प घेऊन जात आहेत. अशा परिस्थिती महाराष्ट्रातून कोट्यवधीची गुतंवणूक असलेला प्रकल्प कोकणातून बाहेर जाता कामा नये, याकडे गाभीर्यांने लक्ष देणे गरजे आहे. नाही तर औद्योगिकरणात महाराष्ट्र अग्रेसर ही ओळख पुसायला वेळ लागणार नसल्याची भीतीही राज ठाकरे यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

कोकणावर निसर्गाने सौदर्यांची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. तिन्ही ऋृतूत कोकण सुंदर दिसू शकतो, त्यामुळेच पर्यटन हा कोकण आणि कोकणी माणासाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो. कोकणाचे कॅलिफोर्निया होणार असे सांगितले जाते. मात्र, या ठिकाणी विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही, कोकणच जगासाठी पर्यटनाचे मॉडेल होऊ शकते. मात्र, त्या दृष्टीने समग्र विचार होण्याची गरज असल्याचे मतही राज ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

कोकणभूमीने सात भारत रत्न दिल्याचा उल्लेख करत राज ठाकरे पुढे म्हणालेत की, सध्या कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे, नोकरीसाठी त्याला शहराची वाट धरावी लागत आहे. पर्यटन कोकणाचे भवित्यव्य बदलू शकतो, पण त्यावर नीट विचार झाला नसल्याकडेही राज यांनी लक्ष वेधले आहे.

या प्रकल्पाला भूमिपुत्रांचा विरोध होता, तो रास्तच होता. त्यांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नव निर्माण सेनेसह सर्व राजकीय पक्ष भूमिपुत्राच्या मागे उभे राहिले होते. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही उद्योग, प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाणे राज्याला परवडणारे नाही. अन्यथा ‘औद्यागिकऱणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही, अशी चिंताही राज यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

शिवसेनेचा या प्रकल्पास विऱोध आहे, मात्र, राज ठाकरे यांनी या पत्रात राज्य सरकारने सामंज्यसाची भूमिका घेऊन तज्ञांच्या मदतीने स्थानिकांची मते बदलावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!