---Advertisement---

पॉलिटिकल सुपर संडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौर्यावर, ममता बॅनर्जी करणार महागाई विरोधात रोड शो

Follow Us:
---Advertisement---

कोलकाता : आज देशात रजकिय सुपर संडे पहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौर्यावर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शाह भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात करणार आहेत. पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध सिलिगुडीमध्ये पदयात्रा काढणार आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मुद्दा बनवत ममता बनर्जी आज सिलीगुडीमध्ये चार किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील भाजपला ताकद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथे शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर दुपारी अडीच वाजता एक मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकिंसाठी बिगुल वाजवणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपने प्रचंड गर्दी वाढवण्याची योजना आखली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्यापूर्वी कोलकाता येथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनी रूट मार्च काढला. पंतप्रधानांचा रविवारचा मेळावा म्हणजे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेल्या ‘परिवर्तन यात्रे’चा समारोप असल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्यात ज्येष्ट अभिनेते मिथुन चक्रवर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!