ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नागरिकांना रोटी, कपडा, मकान देणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला असून यावर आता अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे सुरु केले आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, रोटी, कपडा, मकान देणारं मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे, आज कौशल्य विकास सुरु करण्यात आलं आहे. आशा सेविकांसाठी यांना योजना आणली. कोणतीही दरवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी अर्थसंकल्पात आहे. आम्ही ३ कॉरिडॉर उभे करत आहेत. रस्ते त्याचबरोबर रेल्वेची कनेक्टिविटी मोठ्या प्रमाणावर मजबूत कशी होईल, यावर भर दिला जात आहे. ५ ट्रिलयन डाॅलरचं मोदींचं टार्गेट आहे. या विकासकामांमुळे त्याला गती येईल.

ते पुढे म्हणाले, ”हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असून विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकसल्प आहे.” शिंदे म्हणाले, विरोधकांच्या योजना कागदावर होत्या त्या आम्ही प्रत्यक्षात आणल्या. ८० कोटी लोकांना मदत केली. विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही राहिलं नाही. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीकडे १ नेता उरला नाही. त्यांचा सुपडा साफ झाला आहे. अबकी बार ४०० पार ही गॅरेंटी जनतेने घेतली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं घरीच बसवतात, काम करणाऱ्यांना पून्हा निवडून आणतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे याना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!